दुबई: टी २० वर्ल्डकपमध्ये आज उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे. स्पर्धेतील इंग्लंड संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. तर दोन्ही संघांनी सुपर १२ फेरीत प्रत्येकी ४ सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २०१९ मध्ये वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला होता. त्यावेळी इंग्लंडने विजय मिळवत किताब जिंकला होता. दरम्यान आज उभयी संघांत उपांत्य फेरी सामना होणार आहे.
तर स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. यानंतर मात्र आयपीएलला दोष दिला जात होता. तर आता यावरच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने आयपीएलमुळे न्यूझीलंडला फायदा झाल्याचे म्हटले आहे. आयपीएलमुळे यूएईतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्यात मदत झाली. आम्हाला सुरुवातीला वाटलं की आशियाई संघांना फायदा होईल. मात्र आयपीएल खेळल्याने आम्हाला जाणीव झाली हे अंतर जास्त नाही. असे मत केन विलियमसननं व्यक्त केले आहे.
तर सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याने प्रतिक्रिया दिली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला मात देऊ, असा विश्वास ट्रेन्ट बोल्टने व्यक्त केला आहे. ब्लॅककॅप्स या सोशल मीडिया पेजवर बोलताना ट्रेन्ट बोल्टने उपांत्य फेरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते आम्हाला आता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला एका चांगल्या संघाचा सामना करायचा आहे. आतापर्यंत आम्ही सर्व खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल. अशी प्रतिक्रिया ट्रेन्ट बोल्टने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार- नवाब मलिक
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ये तो हसीना का नवाब निकला….; फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची टीका
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

