Share

T20 WC 2022 : …आणि काही मिनिटांतच विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं; एकाची किंमत होती ‘इतकी’!

Published On: 

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमी प्रतिष्ठेचा ठरत असतो. दोन्ही देशातील केवळ क्रिकेट रसिक नव्हे तर इतर लोकही त्याला जिव्हाळ्याचा विषय मानतात. या दोन्ही देशांचा सामना गेल्या काही वर्षात केवळ आयसीसी स्पर्धेत होत असतो. यासाठी क्रिकेटरसिकही सामना पाहण्यासाठी मैदानावर गर्दी करतात. यंदा होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या सामन्याचे तिकीट अवघ्या काही मिनिटात विकले गेले आहे.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी -२० वर्ल्डकपसाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. स्पर्धेत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचे तिकिटांची विक्री सुरु होताच अवघ्या मिनिटांत सगळे तिकीट विकले गेले. आयसीसीच्या टी २० वर्ल्डकपच्या साईटवर फायनलसह ४५ सामन्यांची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. “पहिल्या फेरीसाठी आणि सुपर १२ टप्प्यासाठी मुलांची तिकिटे ५ डॉलर आहेत, तर प्रौढांची तिकिटे २० डॉलर आहेत.

टी २० वर्ल्डकपची सुरुवात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या वेळेत ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर खेळवले जाणार आहे. इतिहासात पहिल्यांदा टी २० विश्वचषक ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला जाणार आहे. वर्ल्डकपचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!