नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल (७ फेब्रुवारी ) संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर चांगलाच निशाणा साधला. कोरोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये कोरोना वाढला,असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. यावरच राष्ट्रवादीने मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.
पंजाब राज्यातून खूप कमी लोक बाहेरच्या राज्यात कामगार म्हणून जातात. उलट उत्तरेतील अनेक राज्यातील कामगार हे पंजाबमध्ये शेतीच्या कामावर जात असतात. असे असतानाही पंजाबमध्ये कोरोना वाढवण्यामागे महाराष्ट्राचा बादरायण संबंध जोडण्यामागचा पंतप्रधानांचा हेतू स्पष्ट आहे.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 7, 2022
पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे सध्या बिगूल वाजलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य योगायोग नक्कीच नाही. वास्तवात एका रात्रीत घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांतून परप्रांतीय श्रमिक आपापल्या गावाला मिळेल त्या साधनाने, प्रसंगी रस्त्याने चालतही गेले. मग पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फक्त याच राज्यांचा उल्लेख का केला? असा सवाल नरेंद्र मोदींनी केला आहे.
लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने श्रमिक ट्रेन चालविल्या होत्या. सर्वाधिक ट्रेन या गुजरात राज्यातून सुटलेल्या आहेत. तर उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ट्रेन गेल्या होत्या. ही माहिती केंद्र सरकारच्यावतीने १६ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत दिली गेली होती. मात्र पंजाब राज्यात श्रमिक ट्रेन गेल्या नव्हत्या. पंजाब राज्यातून खूप कमी लोक बाहेरच्या राज्यात कामगार म्हणून जातात. उलट उत्तरेतील अनेक राज्यातील कामगार हे पंजाबमध्ये शेतीच्या कामावर जात असतात. असे असतानाही पंजाबमध्ये कोरोना वाढवण्यामागे महाराष्ट्राचा बादरायण संबंध जोडण्यामागचा पंतप्रधानांचा हेतू स्पष्ट आहे. असे राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत ट्वीटरवर म्हटले आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही. असा टोलाही राष्ट्रवादीने लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप; वंचित बहुजन आघाडीची राज्यपालांकडे चौकशीची मागणी
- “इंग्रज परतले परंतु तोडा आणि राज्य करा ही वृत्ती काँग्रेसला देऊन गेले”
- “काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
- ‘तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना…’, संजय राऊतांनी व्यक्त केल्या भावना
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी


