परभणी : परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे २४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता कोरोनाने निधन झाले. १५ एप्रिल रोजी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना परभणी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अनुषंगाने त्यांनी जिल्हा कोषाधिकारी या पदाची संपूर्ण दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडली. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे कोषागार अधिकारी या पदी कार्यरत असलेले सुनील कोंडीबा वायकर यांचा जन्म २ एप्रिल १९६८ चा होता. तर ते २ मे १९९५ ला महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब लेखाधिकारी या पदावर सेवेत दाखल झाले. दरम्यान त्यांना गट अ पदी पदोन्नती मिळालेली होती. त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.
- ‘या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत’ ; शोएब अख्तरने भारतीयांसाठी मागितली अल्लाहकडे दुवा
- संबंधित रूग्णालयांना रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे लागणार; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश
- सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप
- ‘तुमच्या अनेक चुका आहेत…’ कंगना रनौतने केजरीवाल यांना सुनावले
- पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

