Share

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार! पालकमंत्री मुंडेंनी घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

बीड: कोरोना काळातही आपली जबाबदरी चोखपणे पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागा अंतर्गत हे कक्ष स्थापन करण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीदरम्यान संबंधित अधिकार्यांना त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

सामाजिक न्याय विभागांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची २१ प्रकरणे प्रलंबित आहेत, ही सर्व प्रकरणे तातडीने संबंधित विभागांनी कार्यवाही करून मार्गी लावावीत असे निर्देशही दिले त्यांनी यावेळी दिले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा अनुशेष भरून काढणे, वारसा हक्क कायदा, ठेकेदारी पद्धत बंद करणे याबाबतची कार्यवाही नगर विकास विभागाने तात्काळ करावी, असे सूचित केले आहे. घनकचऱ्याशी संबंधित कामगारांना सफाई कामगार पदनाम देऊन लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!