इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. सह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला.
परंतु, डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे. या स्पर्धेचा विजेता किमान तीन सामन्यांच्या निकालाने ठरला पाहिजे, असे विधान काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीही प्रशिक्षकांच्या मताशी सहमत आहे. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने होणे गरजेचे आहे, केवळ दोन दिवसांच्या खेळावर सर्वोत्तम कसोटी संघ ठरू शकत नाही, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर कोहलीने असे मत व्यक्त केले होते.
या मुद्द्यावरून बऱ्याच जणांनी आपली मते मंडळी होती आता याच मुद्यावर आता भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने मौन सोडले. भारतीय कर्णधाराचा दृष्टीकोन स्पष्ट करत कोहलीने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची मागणी केल्याचे ऐकणे हास्यास्पद आहे असे अश्विन म्हणाला.
कोहलीने बेस्ट ऑफ थ्री फायनल्सची कल्पना सुचविली आणि पुढे जाण्याचा पर्याय असल्याचे सांगितले, परंतु भारतीय कर्णधाराने यंदाच्या विश्वविजेतेपदासाठी बेस्ट ऑफ थ्री खेळण्याची मागणी केली नाही. एका कसोटी सामन्याने जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्याबाबत आपण ‘पूर्ण सहमत’ नसल्याचे कोहलीने म्हटले होते आणि विजेता एका सामन्याऐवजी ‘बेस्ट ऑफ थ्री’ म्हणजे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने निवडला जावा असा आग्रह धरला होता. ‘मला असे ऐकण्यात आले आहेत की विराट कोहलीने डब्ल्यूटीसी फायनलसाठी तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास सांगितले पण ते हास्यास्पद आहे. सामना संपल्यानंतर माइकल अॅथर्टनने डब्ल्यूटीसीमध्ये वेगळ्या पद्धतीने काय करता येईल असा प्रश्न विचारला होता. याचेच उत्तर विराटने दिले होते की, जर तीन सामने खेळले गेले तर अनुकूलता आणि संघाचे कमबॅक करणे शक्य होईल. कोहलीने कोणतीही मागणी केली नाही,’ अश्विनने आपल्या यूट्यूब वाहिनीवरील व्हिडिओत असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- क्वारंटाईनमधून बाहेर येताच भारतीय खेळाडूंची पूल पार्टी ; फोटो होतोय व्हायरल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न


