Share

‘स्वाभिमानी’ शेतकरी नाही तर राजकीय संघटना; एल्गार ऊस परिषदेतून राजू शेट्टींवर आरोप

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : येथील शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तक्त्यात आंदोलन अंकुश, जय शिवराय शेतकरी संघटना व बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पाचवी एल्गार ऊस परिषद घेण्यात आली. यावेळी चालू हंगामात कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार देण्यात येणारी रक्कम पाचशे रुपये वाढवून द्यावेत. गळित हंगाम संपल्यानंतर उर्वरित ५०० रुपये न दिल्यास कायदेशीर लढाईने ऊस उत्पादकांना पाचशे रुपये मिळवून देऊ, असे धनाजी चुडमुंगे म्हणाले. यावेळी दीपक पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

यावेळी धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने, बी. जी. पाटील, दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर प्रचंड टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनली आहे. असा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसास एफआरपीची रक्कम अधिक दोनशे रुपये, कायदेशीर लढाई केल्यास मिळणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या नेत्याने कोणताही आवाज उठवला नाही.

जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास तयार आहेत, हे यश आंदोलन अंकुशने केलेल्या कायदेशीर लढाईमुळे शक्य झाले आहे. एकरकमी रक्कम १४ दिवसांत न दिल्यास पंधरा टक्के व्याज द्यावे लागणार आहे. यामुळेच कारखाने एकरकमी एफआरपीची रक्कम देत आहेत. भविष्यात नीती आयोगाचे अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!