Share

खतदरवाढीचा स्वाभिमानी आक्रमकपणे विरोध करणार, शेतकऱ्यांच्या साथीने जनआंदोलन उभारणार

Published On: 

सोलापूर – केंद्र शासनाकडून शेतीसाठी लागणाऱ्या खतांची दरवाढी करण्यात आलेली आहे हा अत्यंत कठोर चुकीचा आणि शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारा निर्णय आहे. यामुळे आधीच कोरोनाने संकटात सापडलेला शेतकरी आणखी खोल संकटात जाणार आहे.

या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे मैदानात उतरणार असुन या बाबतच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी काल घेण्यात आलेली राज्य कार्यकारणीची ऑनलाईन बैठक त वाढत्या खतदराविरोधात गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन आपल्या गावामध्ये, घरासमोर, शिवारामध्ये शक्य त्या ठिकाणी करून निषेध करावयाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या बाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रवक्ते रणजीत बागल म्हणाले की, आज कोरोनाच्या भिषण संकटामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे.त्यात हा खतदरवाढीचा निर्णय म्हणजे  बळीराजाला आणखी संकटाच्या खाईत लोटणारा ठरणार आहे.या निर्णयामुळे शेतीव्यवस्था पुर्णपणे कोलमडून पडणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्याची सध्या पेरणीची देखील लगबग सुरू होणार आहे.अशावेळेस खतांची देखील शेतकऱ्यांना  गरज भासणार आहे त्यांमुळे शेतकर्यांना अडवून आणण्याचाच प्रकार सरकारकडून केला जातोय असा स्पष्ट आरोप बागल यांनी केला आहे.या निर्णयाविरोधात सामान्य शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे म्हणुनच या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या साथीने एक मोठे जनआंदोलन उभारणार आहे असेही बागल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!