🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. काल गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
चक्रीवादळ गुजरात दिशेने चालले असले तरी महाराष्ट्रावरील धोका कायम आहे. येत्या २४ तासांमध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टी अतिमुसळधार पावसाचा इशारा आता मुंबई हवामान खात्याने दिला आहे. तसेच तशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे.
या वादळाशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज होत असताना भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. ‘उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात २०२० व २०२१ मध्ये चक्रीवादळ. २०२० व २०२१ मध्ये कोरोना मृतांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर, अजूनही वाईट गोष्टी सुरूच आहेत. सर्व वाईटच होतंय. पनवतीयों का बाप है ये बॉस ,” अशी टीका करताना नितेश राणे यांनी वादग्रस्त विधानही केलं आहे.
2 years of Uddhav Thackray Gov in Maharshtra..
cyclone 2020 .. cyclone 2021
No.1 in COVID numbers n deaths in 2020 n 2021 .. story continues..
Sub bura hi ho raha hai..Panvatiyo ka baap hai ye boss !!
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 17, 2021
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे
दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. सिंधदुर्गात वादळामुळे खुप नुकसान झाले आहे.. घर,गोठे,बागा,मछिमारांचे पण खुप नुकसान झाले आहे असे समजते.. आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत..कुठे कुठे नुकसान झाले आहे याचीही माहिती घेत आहोत.. सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देतो! असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! आ.श्वेता महालेंनी सुरू केले आधार कोविड सेंटर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
- लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने भाजपचे तीन आमदार ताब्यात
- सकारात्मक! २५ दिवसांनंतर कोरोनाचे नवे रुग्ण तीन लाखांपेक्षाही कमी
- कोरोना संसर्ग, मृत्यू टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी लाभदायक नाही; आयसीएमआरचे मत
- धोनीच्या अंदाजात हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तोडंघशी पडला फलंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
