Share

दिलासा! आ.श्वेता महालेंनी सुरू केले आधार कोविड सेंटर

Published On: 

बुलडाणा : देशासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पीएसए प्लांट उभारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. तसेच देशातील सर्व पीएसयूच्या मदतीने देखील देशात ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ऑक्सिजनची कमतरता पूर्णपणे दूर होईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर आमदार श्वेता महाले यांनी सुरु केलेले आधार कोविड केअर सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी आधार रुग्णालय ठरणार असल्याची आशाही व्यक्त केली.

चिखली येथे आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने व लोकसहभागातून स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणाऱ्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. बिकट परिस्थितीत आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आधार कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी, केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत केली असून रिमडेसिवीरचा सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला असल्याची माहिती दिली.

स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू करण्यात येत आहे. गेल्या एक वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहोत. आधार कोविड सेंटर च्या माध्यमातून आपण रुग्णांना मानसिक तसेच आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करून आधार रुग्णालय राज्यात आदर्श कोविड सेंटर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने अभिवचन आमदार श्वेता महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!