चिपळूण: चिपळूण बचाव समितीचे गेल्या चार दिवसांपासून चिपळूण (Chiplun) येथे साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) शुक्रवारी चिपळूण येथे आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणात आलेल्या पुराचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली आणि कोल्हापुरात महापुराने होणारे नुकसान टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासह पंचगंगेचे (Panchaganga) पाणी बोगद्याद्वारे राजापूर बंधाऱ्यापुढे सोडण्याची कल्पना मांडली होती. जलसंपदा मंत्र्यांच्या या वक्तव्याची राजू शेट्टी यांनी खिल्ली उडवली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्या त्या व्यक्तव्याची खिल्ली उडवताना म्हणाले, जलंसंपदा मंत्री म्हणतात की, कृष्णा नदीत बोगदा काढू. हे कृष्णा नदीत बोगदा काढायला निघाले होते. मग आता कोकणातील पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी चिपळूनमध्ये बोगदा काढून तो आता समुद्रात सोडा, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी जयंत पाटलांच्या त्या व्यक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आरोग्य विभागाच्या पेपरफूटीवर अजित पवार म्हणतात, त्याच्यावर…
- औरंगाबादेतील शाळा सुरु होणार नाही; मनपाकडून पुन्हा एकदा निर्णय लांबणीवर!
- चक्क सलमान खानच्या बहिणीने केले कतरिनाच्या लग्नाचे फोटो शेअर
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
- अजित पवारांचे मोठे वक्तव्य; बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

