🕒 1 min read
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद. यावेळी राज्यातील अनेक विषयांवर त्यांनी वक्तव्ये केले आहेत. ओमायक्रॉन (Omicron) विषाणूचा संसर्ग त्याच सोबत राज्यात होणारे लसीकरण (Vaccination), या बाबतीत अजित पवार यांनी माहिती दिली आहे. राज्यातील शाळा सुरू होण्यासंदर्भात विचारले असता त्याचा निर्णय राज्यसरकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात अनेक घडामोडी सुरू आहेत. राजकरणातला गोंधळ एकीकडे तर परीक्षेतील गोंधळ दुसरीकडे अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. आरोग्य सेवेच्या परीक्षांमध्ये झालेला गोंधळ सर्वश्रुत आहे. या संदर्भात देखील अजित पवार यांनी वक्तव्यं केलं आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांचा पेपर फुटल्याची घटना घडली होती, पेपरफुटी प्रकरण झालेला पेपर रद्द करण्याची मागणी येत आहे, यावर देखील अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षांवरील आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, एमपीएससीला या सगळ्या परीक्षा घेणं अवघड आहे, हे शासनाने घेतलेले निर्णय घेतले ते स्वीकारलं पाहिजे, तसेच या पेपेरफूटी प्रकरणात ज्याच्या चुका असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ती कारवाई एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कोणी अस करण्याची हिम्मत करणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- चक्क सलमान खानच्या बहिणीने केले कतरिनाच्या लग्नाचे फोटो शेअर
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
- अजित पवारांचे मोठे वक्तव्य; बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण…
- मनसे म्हणजे गळकं घर तर शिवसेना चिरेबंदी वाडा, पालक मंत्री सुभाष देसाईंचा मनसेला टोला!
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून 3 दिवसांचा शेवटचा अल्टिमेटम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
