Share

सुयश टिळक,आयुषीच्या हळदीचा कार्यक्रम; फोटो, व्हिडिओ झाले व्हायरल …!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यावर्षातील लग्नाच्या सिझनला सुरुवात झाली असून या सीझनचा श्रीगणेशा मराठी अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांच्या लग्नाने होत आहे. प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला असून सुयश आणि आरुषी लग्नबंधनात अडकत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मेहेंदीचे, हळदीचे आणि संगीत कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकतेच या दोघांचे हंडीचे फंक्शन संपन्न झाले. या कार्यक्रमात सुयश आणि आयुषीसोबत त्यांच्या नातेवाईकांनी देखील धमाल केली. त्यांच्या मजामस्तीचे व्हिडिओ आणि फोटो खूपच गाजत आहे. यावेळी सुयशने पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता तर आयुषीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. हळदीने माखलेल्या या जोडप्याचा इथे देखील भरपूर रोमान्स सुरु दिसला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या हातावर सुयशच्या नावाची मेहंदी चढली आहे. शिवाय संगीताच्या कार्यक्रमात या दोघांनी केलेला रोमँटिक डान्स देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लवकरच आयुषीचा आगामी सिनेमा येणार आहे. सुयशने त्याच्या साखरपुड्याची घोषणा करताना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. हॅप्पी बर्थ डे लव…. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालोय. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने व प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय..सर्वांचे मनापासून आभार.’हे दोघे २१ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!