नागपूर : तुकाराम मुंढे यांचा नागपूर महानगर पालिकेतील आयुक्तपदाचा कार्यकाळ विशेष चर्चेत आहे. त्यांच्या या कार्यकाळात नागपूरकरांची कामे रोखठोक होत आहेत. विशेष म्हणजे त्यांना कर्तव्यात कसूर केलेली अजिबात खपत नसल्याचे माहिती असून देखील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब लक्षात येताच मुंढेंनी कामचुकारांची झाडाझडती घेत निलंबनाची कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईने अनेकांमध्ये धडकी भरली आहे.
आजवर तुकाराम मुंढे यांनी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे. त्यांच्या कार्यकाळात कामचुकारी चालत नाही हे सर्वश्रुत असून, याचसाठी राज्यातील असंख्य लोक त्यांचे चाहते आहेत. पण काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि नोकरी गमवून बसतात.
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष 24 तास सुरू असतो. मात्र रात्र पाळीसाठी बोलाविण्यात आलेले येथील चार कर्मचारी जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याची माहिती तुकाराम मुंढे यांना मिळाली होती.
शुक्रवारी भल्या पहाटे तुकाराम मुंढे यांनी नियंत्रण कक्षाला भेट दिली. कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत दाहाळ, सुनील लोहकरे यांना आयुक्तांनी निलंबित केले. त्यानंतर त्यांनी मनपातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली.
हा दौरा दिवसभर असाच सुरू राहिला. शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची मुंढेंनी शहानिशा केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात असून, कर्मचारी कुठे आहे याचे ट्रॅकिंग केले जाते. मात्र तरीही फोन लावून झोनमधील स्वच्छता निरीक्षकांची त्यांनी उलटतपासणी केली.
कोण कुठे आहेत याचे लोकेशन तपासले. या दौऱ्यातही कर्तव्यात कसूर करताना काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी मुंढेंना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले. यामध्ये आशीनगर झोनचे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोनचे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोनचे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
इंदोरीकारांची विखे पाटलांनी घेतली भेट,समाज प्रबोधनाच्या कामाला जाहीर केला पाठींबा
माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय ८० असताना तुम्ही ८५ म्हणता ?
‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

