अहमदनगर : पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे.
आज भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदुरीकर महाराजांची भेट घेतली. विखे पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे,आचार्य तुषार भोसले यांनी देखील यापूर्वी महाराजांची भेट घेतली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज इंदुरीकरांची त्यांच्या ओझर गावातील निवासस्थानी भेट घेतली. इंदोरीकर महाराजांचे समाजप्रबोधनाचे मोठे काम असून त्यांनी आपले काम पुढेही अविरतपणे सुरू ठेवावे. समाज आणि माझे पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर विखे पाटलांनी घणाघाती टीका केली आहे. ‘ आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणी जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे. दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका असून आपल्या दुधसंघातून मलीदा खाण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत.’ असा आरोपही विखे पाटलांनी केला.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांना राज्यातून पाठींबा वाढत आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे देशमुख यांनी देखील इदुरीकर महाराज यांना पाठींबा दिला आहे. ‘महाराज आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही घाबरू नका. छत्रपतींचे सर्व मावळे तुमच्या सोबत आहेत. स्वतःला एकटे समजू नका. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू’. अस बाबाराजे देशमुख म्हणाले आहेत.
बाबाराजे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देखील त्यांनी महाराजांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची तुम्हाला शपथ आहे महाराज तुम्ही कीर्तन बंद करू नका अशी कुत्री रोज भुंकतील त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका यांच्याकडे लक्ष द्यायला आम्ही समर्थ आहोत’ अस आवाहन देखील बाबाराजे देशमुख यांनी इंदुरीकर महाराज यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय ८० असताना तुम्ही ८५ म्हणता ?
‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!
संजय राऊतांनी दिल्या वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

