Share

माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय ८० असताना तुम्ही ८५ म्हणता ?

Published On: 

औरंगाबाद : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे राज्याला अडचणीत पाहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पायाला भिंगरी लावत महाराष्ट्रभर दौरे करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. सोलापूर आणि नाशिक नंतर पवारांची स्वारी आज औरंगाबाद होती. कोरोनाने विळखा घातलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई हे देखील यावेळी उपस्थित होते. पवारांनी पत्रकार परिषदे घेऊन, औरंगाबादमधील कोरोना स्थितीची माहिती दिली

पत्रकारांनी त्यांचं वय आणि ते राज्यभर फिरुन घेत असलेला आढावा, लातूर भूकंपावेळी पवारांनी घेतलेले निर्णय, याबाबत प्रश्न विचारलं. त्यावर पवार म्हणाले, “माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 म्हणता”. पवारांच्या या वाक्याने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

मोठी बातमी : पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

“लातूरचा भूकंप होता, तो एका जिल्ह्यातील काही भागापुरता सिमीत होता. त्यावेळी तिथे जाऊन बसण्याची गरज होती. पण आताचं कोरोना संकट हे मोठं आहे, सबंध महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले, तर अन्य जिल्ह्यातील तातडीने निर्णय घेण्याच्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह आहे की कॅप्टनने एका ठिकाणी बसून, सगळी टीम काम करते की नाही, त्यावर नियंत्रण ठेवावं. काही कमतरता असेल ती सांगावी. पालकमंत्री इथून गेले की ते मुख्यमंत्री आणि संबंधित घटकांशी उद्या बोलतील”

मुख्यमंत्री टीमकडून काम करुन घेत आहेत. सर्वांशी संवाद आणि समन्वय ठेवून मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. मी फिरतोय कारण मी सतत लोकांमध्ये जाणारा माणूस, मला एकाजागी बसवत नाही, असं शरद पवार म्हणाले.

‘त्या’ आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट, केली ‘ही’ मोठी मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!