नवी दिल्ली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व पक्षाच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. फक्त एव्हढेच नव्हे तर सुश्मिता यांनी आपल्या ट्वीटर प्रोफाईलमध्ये देखील काँग्रेसची माजी सदस्य असा उल्लेख केला आहे. दरम्यान,सुष्मिता यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे कळवले आहे.तसेच त्यांनी या पत्रामधून काँग्रेसचे सर्व नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत.
सुष्मिता यांनी घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस खासदार रिपुन बोरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुष्मिता देव एक समर्पित काँग्रेस नेत्या होत्या, त्या असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते. आम्ही कुटुंबासारखे होतो. जर त्यांना पक्षाच्या विरोधात काही समस्या असेल तर त्याविषयी त्यांनी त्यावर चर्चा करायला हवी होती. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि राजीनामा मागे घ्यावा.
Sushmita Dev was a dedicated Congress leader, never thought she would take such a decision. We were like family. If she had anything against the party, she should have discussed it. I request her to reconsider her decision & withdraw resignation: Congress MP Ripun Bora pic.twitter.com/ljJ1GUI8iY
— ANI (@ANI) August 16, 2021
दरम्यान, सुष्मिता देव यांनी आसाम निवडणुकीवेळीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु ही फक्त अफवा असल्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक अशी सुश्मिता यांची ओळख आहे.तसेच त्या गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसशी संबंधित होत्या. त्यांनी आपण पक्ष का सोडत आहोत, याचे कुठलेही कारण दिलेले नाही. सार्वजनिक जीवनात आपण नवा अध्याय सुरु करत आहोत, एवढाच उल्लेख त्यांनी केला आहे.
‘सीएए’ला दिला होता पाठिंबा
सुष्मिता देव यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली होती. तेव्हापासून त्या चर्चेत होत्या. आसाम मधील बराक खोऱ्याचे प्रतिनिधीत्व त्या करत होत्या. तेथील जनतेचा सीएएला पाठिंबा असल्याने आपणही या विधेयकाच्या बाजूने आहोत, असे देव यांनी स्पष्ट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- आजपासून ‘या’ चार केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

