Share

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर; वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार?

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यातील राजकारणात रोजच नवीन ट्विस्ट बघायला मिळत आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी तर शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावही दिलाय. मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर येतेय.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते २० नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. या भेटीत त्यांच्यात युतीबाबत काही चर्चा होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान , प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबद्दलही भाष्य केलंय. “ज्यांचा टीआरपी कमी होतो, अशी लोकं आपला टीआरपी वाढवण्यासाठी भारत जोडोला हजेरी लावत आहेत. मी काही त्या कार्यक्रमाला जाणार नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

त्याचबरोबर राहुल गांधींनी हेरॉल्डचं प्रकरण काय आहे हे लोकांना सांगावं. त्यांनी हेरॉल्डबाबतचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय लोकं त्यांच्याशी जोडली जाणार नाहीत, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!