Share

Sushama Andhare | “प्रिय कब्बु… तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..!”, सुषमा अंधारेंचं मुलीला भावुक पत्र

Published On: 

🕒 1 min read

Sushama Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी त्यांच्या लेकीला अतिशय भावूक पत्र लिहिलं आहे. अंधारे यांचं राजकारण आता खाजगी पातळीवर आलं आहे. त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभमीवर हे पत्र महत्वाचं मानलं जातं आहे.

प्रिय कब्बु, तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.

तसेच, बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..! तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात, असं देखील त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, बाबासाहेब लिहितात, ” जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील, पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील, असा भाव त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा ” _ डॉ बाबासाहेब आंबेडकर , अशा पद्धतीने सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पत्राचा अंत केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!