🕒 1 min read
Anjali Damania | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राजकारण तापलं आहे. अशातच भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते मुंबई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत आहेत.
विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
The video which is been shown on ABP maaza clearly does not show anything like this
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 14, 2022
तर दुसरीकडे, भय ,भ्रम,चरित्र आणि हत्या ही मनुवाद्यांची चार हत्यारं आहेत. असे डॉ.बाबासाहेब म्हणाले होते. चळवळीत चारही परीक्षा द्याव्या लागतात. आव्हाड साहेब आपण शिव शाहु फुले आंबेडकरांचे सच्चे वारसदार आहात, असं अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये, अशी मी त्यांना विनंती करणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आव्हाड यांना भेटण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
राजकीय लढाई इतक्या खालच्या स्तरावर महाराष्ट्रात गेली नव्हती, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अशी परिस्थिती दिसत आहे. गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी मुंख्यमंत्रीही त्या महिलेला भेटलेले दिसत आहेत. त्यामुळे हा गुन्हा त्यांनी स्वःतहून दखल घेतल्याने दाखल झालेला आहे असं दिसत असलं तरी या प्रकरणात चर्चा आणि बैठका होऊन कदाचित गुन्हा दाखल झालेला आहे किंवा त्यांना प्रवृत्त केलेलं असावं, असं पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये”, जयंत पाटलांची विनवणी
- Jitendra Awhad | “खोटा आरोप, खोटा गुन्हा”, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक
- Sanjay Raut | “आमच्या शिवरायांना विकू नका!”, सामनातून राऊतांचा हल्लाबोल
- Amol Mitkari | “चळवळीत ‘या’ चार परिक्षा द्यावा लागतात, आव्हाड साहेब…”, अमोल मिटकरींनी केली आव्हाडांची पाठराखन
- Deepak Kesarkar | ठाकरे अन् शिंदे गट येणार एकत्र?, दीपक केसरकर म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
