🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) चा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेरावे हप्त्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. यावेळी केंद्र सरकारने हप्ता भरण्यासाठी थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे की राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना ही मदत वेळत त्यांच्या खात्यात पोहोचवी. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांकडून छोट्या छोट्या चुका होत आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे पोहोचत नाहीत. म्हणूनच या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल माहिती सांगणार आहोत.
ई-केवायसी नसल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळणार नाही
पीएम किसान योजनेमध्ये काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे दाखवून बारावा हप्ता मिळवला आहे. योजनेतील ही फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी सुरू केले आहे. ई-केवायसीशिवाय शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केले नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे.
आधार आणि बँकेमध्ये वेगवेगळी माहिती
देशामध्ये आधार कार्डला प्रमुख ओळखपत्र मानले जाते. दरम्यान, आधार कार्डवर असलेली माहिती वैध आहे असे देखील समजले जाते. त्यामुळे बँकेचे पासबुक आणि आधार कार्डवर वेगवेगळी माहिती आढळल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
बँक डिटेल्स चुकीचे भरल्यास तेरावा हप्ता मिळणार नाही
प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक डिटेल्स चुकीचे भरल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक आयडीएफसी कोड इत्यादी माहिती बरोबरच भरावी.
पत्ता बरोबर नसेल तर पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळणार नाही
पीएम किसान योजनेच्या वेळी शेतकऱ्यांनी नोंदणी करताना प्रत्येक अपडेट योग्य भरणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी माहिती भरताना अपयशी ठरतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या पत्त्यामध्ये देखील अनेक चुका आढळतात. जर शेतकऱ्यांच्या नोंदणी मध्ये पत्ता चुकीचा निघाला तर शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania | “जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले, पण…”, अंजली दमानियांचे विधान
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये”, जयंत पाटलांची विनवणी
- Jitendra Awhad | “खोटा आरोप, खोटा गुन्हा”, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक
- Sanjay Raut | “आमच्या शिवरायांना विकू नका!”, सामनातून राऊतांचा हल्लाबोल
- Amol Mitkari | “चळवळीत ‘या’ चार परिक्षा द्यावा लागतात, आव्हाड साहेब…”, अमोल मिटकरींनी केली आव्हाडांची पाठराखन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
