टीम महाराष्ट्र देशा :२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. देशासह महाराष्ट्रातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. राज्यात कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
सोलापूरमधून भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर बोलताना शिंदे यांनी ‘ही शेवटची निवडणूक होती या शब्दावर कायम आहे, परंतु लोकांसाठी काम करत राहणार, अस वक्तव्य केले आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी शिंदे यांनी ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल’ असे भावनिक आवाहन केले होते. परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीतही सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यावेळी भाजपच्या शरद बनसोडे यांनी त्यांचा पराभव केला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

