🕒 1 min read
मुंबई : लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारा रक्षाबंधनाचा सण देशभरात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. रक्षाबंधन हा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अलीकडे तर लांब असणारे भाऊ-बहिणही व्हिडीओ कॉलिंगद्वारे हा सण साजरा करतात.
दरम्यान, बॉलीवूडमधून देखील रक्षबांधन जोरादार साजरी होत आहे. अशातच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने, सुशांतच्या बहीणने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. श्वेता सिंह कीर्तीने तिच्या स्मृतीमध्ये तिच्या भावासोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, ‘लव्ह यू भाई, आम्ही नेहमीच एकत्र राहू. असे लिहीत गुलशन गुडिया असा हॅशटॅगही दिला आहे.
https://www.instagram.com/p/CS2H23-FX9y/?utm_source=ig_web_copy_link
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. पण त्याच्या निधनापासून आजपर्यंत असा एकही दिवस आला नाही की, त्याचे चाहते त्याला विसरले असतील. त्याचे चाहते नेहमीच त्याच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात.
महत्वाच्या बातम्या :
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

