🕒 1 min read
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेच्या शुटींगला सुरवात झाली आहे. या मालिकेच्या नवीन भागात प्रेक्षकांना अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत सुशांत सिंह राजपूतच्या ऐवजी अभिनेता शाहिर शेख दिसणार आहे. या मालिकेवर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेता शाहिर शेख आणि अंकिता लोखंडे या दोघांचा एक फोटो शेअर केला आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘ही मालिका पुन्हा सुरू असल्याचा मला खूप आनंद होतो आहे. ‘पवित्र रिश्ता २’ मालिकेच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!’, अशी एक भावूक पोस्ट तिने शेअर केली आहे.

याआध ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने अल्पावधीतच लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. विशेष म्हणजे या मलिकेतील अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी केलेली अर्चना-मानवची जोडी चांगलीच चर्चेत होती. या दोघांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती. सुशांत सिंग राजपूतने २००९ ते २०११ सालापर्यंत पवित्र रिश्ता मालिकेत काम केले होते. त्यानंतर अभिनेता हितेन तेजवानी मानवच्या भूमिकेत झळकू लागला. आता पुन्हा एकदा ही मालिका येणार असल्याने प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- पंजाब नॅशनल बँककडून नोकर धारकांना मिळणार 3 लाखांचा लाभ
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

