🕒 1 min read
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असतात यामध्ये ऑनलाईन बँकिंग मुळे तर अमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक बँक आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा घेऊन येत आहेत. या दरम्यान पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी देखील नोकरदार वर्गातील ग्राहकांना तीन लाखांची एक विशेष सुविधा घेऊन येत आहे.
याबाबत पीएनबीने ट्वीट करत लिहिले की, ‘तुमचा पगार चांगल्या पद्धतीने मॅनेज करू इच्छित आहात? तर PNB MySalary Account उघडा. याशिवाय वैयक्तिक अपघात विमा आणि यासह ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधा मिळवा’.

ही सुविधा मिळवण्यासाठी असे करा –
- तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेत माय सॅलरी खातं सुरू करावं लागेल.
- हे खातं 4 कॅटेगरीमध्ये देण्यात येत आहे- सिल्वर, गोल्ड, प्रीमियम आणि प्लॅटिनम.
- हे खातं तुमच्या पे स्केलच्या हिशोबाने उघडण्यात येणार आहे.
- अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://www.pnbindia.in/salary-saving-products.html या लिंकला भेट द्या.
या खात्याअंतर्गत ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंतची मोफत विमा सुविधा देण्यात येत आहे. 10 हजार ते 25 हजार रुपये पगार असणाऱ्यांचे खाते सिल्ह्वर कॅटेगरी, 25001 ते 75000 रुपये पगार असणारे गोल्ड कॅटेगरीमध्ये खातं उघडू शकता. 75001 रुपये ते 150000 रुपये पगार असणारे प्रीमियम आणि 150001 रुपयांपेक्षा जास्त पगार असणारे प्लॅटिनम कॅटेगरीमध्ये खातं मिळेल. अशी या बँकेची एक सुविधा नियोजीत करण्यात आली आहे.
ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी
विशेष म्हणजे तुम्ही हे खातं झिरो बॅलन्स असला तरीही उघडू शकता. शिवाय या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देखील मिळते आहे. यात सिव्ह्वर कॅटेगरीत असणाऱ्यांना 50 हजारांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, गोल्ड कॅटेगरीत 150000 रुपये, प्रीमियम कॅटेगरी 225000 आणि प्लॅटिनम केटेगरी 300000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
- चहल-कुलुदीपची धमाल मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
- रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
