Share

बीडच्या कबाड गल्लीतून १ लाखाची दारू जप्त

Published On: 

🕒 1 min read

बीड: एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अवैध धंदे दोन्हीला आळा घालणे कठीण काम झाले आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. पण अवैध धंदे मात्र सुरूच आहेत. दुकाने बंद ठेवावे लागत असल्याने मागच्या दाराने तसेच  शहरातील कबाड गल्लीतून एक लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला होता. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी केली.

सध्या लॉकडाऊन असून मद्याची अवैधरीत्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवून आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कबाड गल्लीतील अंकुश वसंतराव कदम याच्या घरी छापा टाकला असता तेथील जिन्याखाली एक लाख ६४ हजार १६० रुपये किमतीचे देशी दारूचे बॉक्स आढळून आले. देशी दारूचा हा साथ पोलिसांनी ताब्यात घेऊन टाकला व संबंधितावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, अंकुश कदमकडून देशी दारू खरेदीकरिता आलेला दादासाहेब सदाशिव कांबळे (४२ वर्षे, रा. पंचशील नगर, बीड) यालाही अटक केली. अंकुश कदम फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बीड विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कडवे व आदींनी केली. लॉकडाऊन कालावधीत १ एप्रिल २०२१ पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारूविक्री विरोधात राबवलेल्या मोहिमेत ९७ गुन्हे नोंदवले तर ५२ आरोपींना अटक केली. या कालावधीत देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल व वाहनांसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. -नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!