Share

चाहत्याच्या प्रश्नावर सूर्यकुमारने दिले अभिनास्पद उत्तर ; विराट-धोनीबद्दल विचारला होता प्रश्न

Published On: 

मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया मुख्य खेळाडूंविना श्रीलंकेचा दौरा करेल. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यासारखे खेळाडू या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत. कारण यावेळी ते इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार टीम इंडिया श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी -२० मालिका खेळणार आहे.  इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये सूर्यकुमारची निवड झालेली नाही. श्रीलंकेत जुलै महिन्यात होणाऱ्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी त्याची निवड निश्चित आहे.

दौऱ्यापूर्वी खेळाडू आपल्या घरी वेळ घालवत आहेत. त्यासोबतच खेळाडू आपली आवड देखील जपताना दिसत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. सध्या सूर्यकुमार यादव देखील सोशल मीडियावर बराच सक्रिय झाला आहे. या वेळेचा उपयोग करण्यासाठी सूर्यकुमारने सोशल मीडियावरुन फॅन्सशी संवाद साधला. त्याने यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या टीम इंडियाच्या आजी-माजी कॅप्टनबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली.

सूर्यकुमारनं इन्स्टाग्रामवर फॅन्ससाठी प्रश्न-उत्तराचे सेशन ठेवले होते. त्यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. एका फॅनने त्याला विराट आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितले. त्याला उत्तर देताना सूर्यकुमारनं धोनीचं महान तर कोहलीसाठी प्रेरणा असे उत्तर दिले आहे. या उत्तराने सूर्यकुमारने सर्वांची मन जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!