🕒 1 min read
मुंबई: लवकरच भारताची श्रीलंकेविरुद्ध मालिका सुरु होणार आहे. नाव कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय आणि टी २० अशा दोन्ही मालिका जिंकत विजयी सुरुवात केली आहे. मात्र मालिका सुरु होण्याआधी भारताच्या दोन स्टार खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध सामनावीर आणि मालिकावीर ठरलेला सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्ध खेळू शकणार नाही. सूर्याने विंडीज विरुद्ध तीन सामन्यात १०७ धावा केल्या होत्या. सोबतच भारतीय संघात अष्टपैलू कामगिरी करणारा दीपक चहर देखील मालिकेतून बाहेर पडला आहे. यासंबंधी माहिती देताना बीसीसीआयने निवेदनात सांगितले ” वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी २० मालिकेतून वगळण्यात आले आहे. कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नात सूर्यकुमारला हेयरलाईन फ्रॅक्चर झाले आहे.”
दीपक चहरची दुखापत सुद्धा गंभीर असल्याने त्याचे आयपीएलमध्येही खेळणे सध्या अनिश्चित दिसत आहे. बीसीसीआयने विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्याची आधीच घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतीय संघात ४ प्रमुख खेळाडु खेळताना दिसणार नाहीत. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेला गुरुवारपासून लखनऊमध्ये सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “आता पुजारा आणि रहाणेचे संघात पुनरागमन अशक्य”; जडेजाचे वक्तव्य
- Nawab Malik ED Inquiry : नवाब मलिक ईडीच्या रडारवर! पहाटेपासून चौकशी सुरू
- “काही खेळाडू पत्रकारांचे मस्का लावणे एन्जॉय करतात” ; साहा वादांवर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
- “सांस ले और नाम बता दे” पत्रकाराचे नाव सांगण्यासाठी वीरूचा साहाला सल्ला


