🕒 1 min read
मुंबई : अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) चौकशी सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार, अशी माहिती नवाब मलिक ट्वीट करून दिली होती. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचार वाजता ईडीने धाळ टाकली. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
चौकशी केल्यानंतर ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले आहेत. सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत. इकबाल कासकरनं नाव घेतल्यानंतर मलिक यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम’
नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ईडीने स्वतःचे पोलीस आणून कोणीतही माहिती न देता नवाब मलिकांना घेऊन जाणे म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली आहे. नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून हे करण्याचा प्रकार आहे. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा प्रकार सुरु आहे. यापुर्वी मलिक यांनी दाऊद व्यवहारांवर उत्तर दिले आहेत. राज्यात यंत्रणाचाअती गैरवापर सुरु आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

