Share

सुरेश अण्णा धस म्हणजे माणुसकीचा आदर्श वस्तुपाठ ! वाचा काय आहे प्रकरण

Published On: 

बीड : खळवट लिंबगाव ता.वडवणी इथं एकाच कुटुंबातील तीन जणांचा माजलगाव धरणातील बॅक वॉटरवरून चप्पू पलटी झाल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेकडे प्रशासनाने अजिबात लक्ष दिले नाही.म्हणून गावकर्यांनी वडवणी तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून आंदोलन केलं होतं.

याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चप्पूवरून प्रवास करून सुरेश धस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सर्व ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात प्राणिकपणे मुद्दा उपस्थित करेन असाही शब्द त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.

एका लोकप्रतिनिधीने कसे वागावे याचा आदर्श वस्तुपाठ घालण्याचे काम सुरेश अण्णा धस नेहमी आपल्या कृतीतून घालून देत असतात. आताही अशीच घटना समोर आली आहे. आज सुरेश धस यांनी वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं भेट देऊन जिवाची परवा न करता थेट चप्पूवरून प्रवास करून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सदर गावात एकाच कुटुंबातील पाच जण माजलगाव धरणातील बॅक वॉटरवरून पूल नसल्यामुळे चप्पूवरून आपल्या शेतातून घरी येत होते. यावेळी चप्पू पलटी झाल्यामुळे पाचही जण पाण्यात बुडाले. त्यापैकी आर्यन भारत फरताडे, पूजा राजाभाऊ काळे, सुशीला भारत फरताडे या तिघांचा यामध्ये मृत्यु झाला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!