Share

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाला केलं चीतपट!

Published On: 

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विट करून दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक नेते, गावकरी आले होते.

यादौर्यानंतरच त्यांना कोरोनाची लग्न झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी, गिरीश महाजन यांच्याशी बोलताना, कोरोनाची लागण झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे म्हटले होते.

फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. मुंबईतील सेंट जॉर्ज या हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सेंट जॉर्ज हे सरकारी रुग्णालय आहे. काही काळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी कोरोनाला चीतपट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!