🕒 1 min read
पुणे : परीक्षा असल्यामुळे चित्रीकरण करू शकत नाही, असे एक कारण प्राजक्ता गायकवाड सतत द्यायची. सध्या कोरोना काळात सतत कोणत्या परीक्षा सुरु होत्या, असा प्रश्न कोणालाही पडेल. ती सतत सुट्टी मागायची. सेटवर अनेकदा उशीरा यायची. चित्रीकरणासाठी अनेक सीनिअर कलाकार तासनतास तिची वाट बघायचे. तिला स्क्रिप्ट १५ दिवस आधी हवी, चित्रीकरणासाठी इतकेच दिवस येईल, अशा काय काय तिच्या अटी होत्या. तिची आई नको इतका हस्तक्षेप करायची. निर्माती म्हणून याचा प्रचंड मनस्ताप आम्ही सहन केला.आजवर कुणीही दिला नसेल एवढा मनस्ताप या बाईने मला दिला, असे अलका कुबल यांनी सांगितले होते.या सगळ्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी उत्तर दिले आहे.
प्राजक्ता म्हणाली की ‘अलका ताई वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता व आजही आहे. मालिकेतून मला काढण्यात आले नसून मी स्वत: मालिका सोडली. सहकलाकारासोबत झालेला वाद, त्याने मला केलेली शिवीगाळ या प्रकरणामुळे मी मालिका सोडली. सहकलाकाराने मला शिवीगाळ केल्यानंतर अलका ताईनी माझ्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित होते. योग्य भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र केवळ मालिका सुरु ठेवायची म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. मला सगळे काही असह्य झाले तेव्हा मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. शिवीगाळ करणा-या सहकलाकाराने एका शब्दानेही माझी माफी मागितली नाही. त्याने मला आईबहिणीवरून शिव्या दिल्या, मात्र अलका ताई शांत राहिल्या. बघू, एवढेच त्या म्हणाल्या. केवळ मालिका सुरु राहण्यासाठी अशा लोकांना तुम्ही अभय देत असाल तर मी काम करू शकत नाही, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले.
यापूर्वी ‘मी स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत दोन वर्षे काम केले. त्याआधी ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत काम केले. माझे नखरे असते तर या मालिकेच्या निर्मात्यांनी मला सहन केले नसते. या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केली नाही. पण आता हे आरोप होत आहेत. माझ्या मते, हा फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे प्राजक्ता म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- ‘आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2’ ; नवाब मलिकांनी केली अर्णब गोस्वामीवर जहरी टीका
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
