मुंबई : संगमनेर शहरात एका एसटी चालकाने आर्थिक विवंचनेमुळे बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पगार न मिळाल्याने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे मात्र सरकार ढिम्म बसले आहे. अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आघाडी सरकारवर केली आहे.
भाजपा नेते अतुल भातखळ ट्विटमध्ये म्हणतात, ‘संगमनेर मध्ये एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सकृतदर्शनी सदर चालकाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेवर पगार न मिळाल्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक गर्तेत सापडलेत. सरकार ढिम्म बसले आहे.’ असे ट्विट भातखळकरांनी केले आहे.
संगमनेर मध्ये एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सकृतदर्शनी सदर चालकाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेवर पगार न मिळाल्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक गर्तेत सापडलेत. सरकार ढिम्म बसले आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 21, 2021
मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास संगमनेर स्थानकातील पाथर्डी-नाशिक एसटी क्र(एमएच १४, बीटी ४८८७) बसमध्ये एका चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. या चालकाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये कुणाचेही नाव नाही, आर्थिक विवंचनेमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे. प्रथमदर्शी या चालकाचा मृतदेह बसमध्ये उभे रहाताना पकडण्याच्या लोखंडी बारला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. सुती दोरीच्या सहाय्याने गळफास लावून या चालकाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
- ‘महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही, तुम्ही काय आमचं नेतृत्व करणार?’
- हिरवे लाडू खाणारे सरकार हिंदूंवर गुन्हा दाखल करते, तर महेबूब शेखला वाऱ्यावर सोडते, मनसेला हल्ला
- महाराष्ट्र पुन्हा हादरला! अमरावतीमधील गर्भवती अत्याचार पीडितेची गळफास घेत आत्महत्या
- राज्यसरकार महिला सुरक्षा विषयात अपयशी, राज्याची परिस्थिती चिंताजनक – अभाविप


