Share

Supriya Sule | “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश…”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प हातून गेल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Supriya Sule | मुंबई : आतापर्यंत चार प्रकल्प (Maharashtra Project) बाहेर गेले असता आता उर्जा उपकरण निर्मीती झोन (Energy Equipment Manufacturing Zone) प्रकल्प देखील मध्य प्रदेशला गेला आहे. याबाबत राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.

यादरम्यान, महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, एअरबस टाटा हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेल्यानंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लोकमत वृत्तपत्राचा फोटो त्यांनी ट्विटमध्ये लावला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क आणि टाटा एअरबस यांसारखे अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो तरुणांना रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये होती, यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे.

तसेच, प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तर हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्राबाहेर गेले, असा दावा शिंदे सरकारकडून केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!