Share

Supriya Sule | पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींच्या आम्ही पाठीशी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Published On: 

Supriya Sule | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पंकजा मुंडे यांना आधी विधान परिषद आणि आता मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा दिला आहे.

सुरवातीला अमोल मिटकरी यांच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राष्ट्रवादीतर्फे आज कोथरूडमध्ये महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा आणि राजकारण यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली. तसेच विरोधी पक्ष असले तरी सर्वांचे एकमेकांशी संबंध चांगले असले पाहिजेत, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. अमोल मिटकरी यांनी जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्या संदर्भाने विचार करेल. पंकजा मुंडे ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?

एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले. ते रोहिणी खडसेंच्या लक्षात आले. पंकजा मुंडे यांच्याही ते लक्षात आले पाहिजे. आपल्या पक्षाला वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे पंख कसे छाटतात. तुमच्या पक्षात तुम्हाला भाजपा बाजूला कसं ठेवतंय हे तुम्ही ओळखणं गरजेचे आहे असं सांगत मिटकरींनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!