Share

Ghulam Nabi Azad | “मोदींनी माणुसकी दाखवली, मी त्यांना क्रूर…” ; काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझादांचे बदलते सुर

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, जे लोक माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची चर्चा करतात, ते लोकसभेत भाषण दिल्यानंतर त्यांचे नेते पंतप्रधानांना मिठी मारायला गेले होते हे विसरले आहेत. आझाद म्हणाले की, मी स्वतः काँग्रेस सोडलेली नाही, पण मला घर सोडायला लावले.

कुटुंबातील सदस्यांना घर सोडण्यास भाग पाडले-

काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले की, कोण स्वतः घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी (काँग्रेस) मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. इथे जर आपल्याला परके मानले तर इथून निघून जाणे हे घरात राहणाऱ्या माणसाचे काम आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे खुशामत करणाऱ्या किंवा ट्विट करणाऱ्यांना पक्षात स्थान मिळाले आहे.

राहुल गांधींवर टीका-

आझाद म्हणाले की, जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याची चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:कडे बघावे. मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली होती.त्यांचीच राहुल गांधींनी भेट घेतली.

नरेंद्र मोदी यांनी माणुसकी दाखवली-

यावेळी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, ज्यांचा नरेंद्र मोदींच्या राज्यसभेतील भाषणाला विरोध आहे. ते अशिक्षित आणि अडाणी असतील तर त्यांनी मोदींचे भाषण वाचावे. मोदी साहेबांचे लग्न झाले नाही, त्यांना मुले नाहीत. पण त्यांनी माणुसकी दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!