🕒 1 min read
मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांबाबत बोलत असताना मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने (शेतकरी) स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. अधिवेशनात पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे भाष्य करत होते. यावेळेस ही घटना घडली होती. मात्र या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शेतकरी ने घेतलं होतं पेटवूनः
सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तांदुळवाडी गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी 23 ऑगस्ट रोजी दुपारी आंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हीसकवून घेतली.
या संपुर्ण घटनेमध्ये देशमुख जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बजाज भवन जवळ फुटपाथ वरील झाडाखाली आडोशाला उषा मेहता चौक या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख या शेतकऱ्यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं. मात्र, आज 11:55 वा. मयत घोषित केले. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी ही माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्याः
- Hardik Pandya | पाकिस्तानविरूद्ध सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याच्या पत्नीने केली ‘ही’ पोस्ट
- BMC Election | भाजपने BMC निवडणुकीसाठी कसली कंबर, अमित शहा गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर
- Pregnancy Tips | गरोदर असताना ‘या’ 8 गोष्टी टाळा, अन्यथा…
- Ghulam Nabi Azad | “मोदींनी माणुसकी दाखवली, मी त्यांना क्रूर…” ; काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझादांचे बदलते सुर
- Supriya Sule | आम्हाला काही लपवायची गरज नाही, रोहित पवारांच्या चौकशीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
