Share

Pregnancy Tips | गरोदर असताना ‘या’ 8 गोष्टी टाळा, अन्यथा…

Published On: 

मुंबई : गरोदर असताना आरोग्यासाठी समतोल आहार सर्वात महत्वाचा असतो. चांगला आहार घेतल्यास बाळाचा विकास होण्यास मदत होते. गर्भधारणेदरम्यान, आपण जीवनसत्त्वं, खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहार घ्यावा. या स्थितीत अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, जेणेकरून तुम्ही आणि तुमचं बाळ सुरक्षित राहू शकाल. अशा काही गोष्टी आहेत ज्या गर्भधारणेदरम्यान न खाण्याचा सल्ला दिला जातो. या गोष्टी तुम्हाला आजारी बनवू शकतात अथवा तुमच्या बाळाला हानी पोहोचवू शकतात. स्त्री गर्भवती असताना आजी तिला अनेक प्रकारचे सल्ले देते. तुम्हीही या सल्ल्यांचे पालन करावं. यावेळी कोरोना व्हायरस आणि पसरणाऱ्या सर्व बॅक्टेरियापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुम्ही या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. या सवयी तुम्हाला आणि तुमच्या बाळाला निरोगी आणि सुरक्षित ठेवेल.

पाहा व्हिडीओः

गरोदर महिलांनी ‘या’ 8 गोष्टी करू नयेत

1- गर्भधारणेदरम्यान तुम्ही अल्कोहोलचं सेवन टाळावं. ज्या स्त्रिया दारू पितात त्यांना वेळेपुर्वी डेलिव्हरी, मुलाच्या मानसिक विकासावर परिणाम आणि बाळाचं वजन कमी होणं, अशा समस्या उद्भवू शकतात.

2- पहिल्या 3 महिन्यांत जास्त प्रमाणात कॅफिनचं सेवन टाळावं. त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका संभवतो. जास्त प्रमाणात कॅफिनचाही मुलांच्या वाढीवर परिणाम होतो.

3-गर्भधारणेदरम्यान साखरेचा वापर बंद केला पाहिजे. ते प्लेसेंटा ओलांडून गर्भाशयामध्येच राहू शकतात, जे बाळासाठी हानिकारक आहे.

4- गरोदरपणात तुमच्या आहारातील चर्बीचं प्रमाण कमी करावं. तुम्ही जास्तीत एकूण 30% पर्यंत चरबी कमी करावी. उदाहरणार्थ, जर तुम्ही दिवसातून 2000 कॅलरीज घेत असाल, तर तुम्ही फक्त 65 ग्रॅम चरबी घेतली पाहिजे.

5- गरोदरपणात कोलेस्टेरॉलचे सेवन दररोज 300 मिग्रॅ किंवा त्यापेक्षा कमी असावं.

6- जर तुम्हाला मासे खाण्याचा शौक असेल तर जास्त पारा असलेले मासे खाणं टाळा. यामुळे बाळाच्या विकासावर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

7- या काळात तुम्ही न शिजवलेले सीफूड आणि दुर्मिळ अथवा कमी शिजवलेले पोल्ट्री पदार्थ खाणे टाळावे.

8- गरोदरपणात भरपूर भाज्या खाव्यात. भाज्यांसह संतुलित आहार आवश्यक आहे. खाण्याआधी भाज्या पहिलं धुवा आणि शिजवा, कारण त्यांना टॉक्सोप्लाज्मोसिस होण्याची शक्यता असते.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!