वॉशिंग्टन : कोरोना नंतर जगाचे लक्ष वेधले आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे यामध्ये निवडणुकांनंतर लागणाऱ्या निकालांमध्ये मतमोजणी सुरु असून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपण पिछाडीवर पडत असल्याचे दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयामध्ये धावही घेतली होती. पण जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली.
त्यानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड सुरूच होती तर आता त्यांच्या समर्थकांनी देखील हा पराभव अद्याप स्वीकारलेला नसल्याने संसदेत धुडगूस घातला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली हार आणि जो बायडन यांचा विजय अद्यापही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते.

संयुक्त अधिवेशनाआधी सभागृहाच्या स्पीकर नॅसी पेलोसी आणि उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्सी चर्चा झाली आणि जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत होते.

इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात इमारतीबाहेर जमले होते.

अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. भाषण सुरु असतानाच यापैकी अनेक समर्थक थेट संसदेमध्ये घुसले आणि संसदेत थरार सुरु झाला.

आंदोलकांनी इमारतीमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळताच कॅपिटॉल इमारतीतील पोलिसांनी मुख्य सभागृहाच्या प्रवेशद्वारांचा ताबा घेतला आणि संसदेवरील हैदोस रोखण्यात मदत झाली.

ट्रम्प समर्थकांची घोषणाबाजी, आरडाओरड, गोंधळ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची धावपळ पाहून सिनेटमधील अनेक सदस्यांना बचावासाठी आपल्या आसनांचा आधार घ्यावा लागला.

घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी कॅपिटॉल इमारतीबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…ही आनंदाची गोष्ट, शिवसेना आता बंगालमध्ये मोठा रेकॉर्ड करेल’
- औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासाठी ठाकरेंचं केंद्राला पत्र
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- बिल्डर्सना मोठा दिलासा, प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटने केला मंजूर
- ‘लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते’ ; शिवसेनेच्या अग्रलेखातून गांधी यांचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

