अकोला : संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली असूनही काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशांवर कडक कारवाई करण्यासाठी अखेर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांच्यासोबत सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलीस रस्त्यावर दिसून आले. यावेळी अकोला शहरात हजारांहून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर हे सिटी कोतवाली चौकात पोहोचले. त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व शहरातील पोलिस निरीक्षक होते. संचारबंदी दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांना यावेळी स्वतः हातात काठी घेऊन पोलिस अधीक्षकांनी समजावले तर अनेकांवर कारवाई करण्यात केली.
यावेळी नागरिक पोलिसांना एकच एक कारण देऊन घराबाहेर पडल्याचे सांगत होते. मात्र अनेकांना काहीही काम नसल्याचेही तपासणीत आढळून आले. अशांची वाहनेही पोलिसांनी जप्त केले. तब्बल ४० वर वाहने जप्त करण्यात आले असून अनेकांवर गुन्हेही दाखल केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले
- ‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
- ‘प्रीतम मुंडेंनी त्यांचा खासदार निधी कोविड सेंटरसाठी वापरावा’, वंचितची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
