Share

Girish Mahajan | “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”; म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंवर गिरीश महाजनांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करू राज्यात सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून सत्ताधारी शिवसेना पक्षातील नेत्यांवर सतत कोणत्याना कोणत्या कारणांवरून आरोप, टीका करताना दिसून येतं आहे. गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर एक टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवतो,” असं शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले होते. त्यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले ?

चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. गुलाबराव पाटीलही मंत्री आहेत आणि वरिष्ठ आहेत. चंद्रकांत खैरेंनी बोलताना तोल सांभाळला पाहिजे. वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण काय बोलावं याचा तारतम्य असायला हवं. आपला जुना सहकारी किंवा कुणीही इतर पक्षाचा असेल, त्यांच्याविषयी बोलताना संयम ठेवला पाहिजे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी बोतल होते. पुढे ते असं म्हणाले की, सध्या राजकारणाचा स्तर इतका खालवत चालला आहे की, त्याला पुन्हा एकदा सावरण्याची सांभाळण्याची गरज आहे. चंद्रकांत खैरे माझे मित्र आहेत. मी खैरेंना फोन करून सांगेन की यापुढे बोलताना थोडं तारतम्य बाळगा.

तसेच याकूब मेमन विषयी गिरीश महाजन यांना विचारण्यात आले असता, याकूब मेमन देशाचा शत्रू आहे. त्याच्या काटकारस्थानामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अशा याकूब मेमनच्या कबरीवर लाईटिंग करून सजावट करणे दुर्दैवी आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!