Share

BJP | मुंबईमध्ये लालबागच्या राज्याचं विसर्जन करताना भाजप कार्यकर्तांमध्ये तुफान राडा

Published On: 

मुंबई : दहा दिवसांच्या गणपती उत्सवात अनेक मंडळांमध्ये थाटामाटात उत्सव साजरा केला गेला. अशातच काल लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला आहे. यावेळी मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले असून मुंबईत मात्र भाजपच्याच दोन गटात जोरदार वादावादी दिसून आली. मुंबई मधील प्रसिद्ध लालबागचा राजा गणरायाचं विसर्जन करताना भाजप पक्षाच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाला.

भाजप पक्षांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान वादः

मुंबईच्या इतर भागांप्रमाणेच दिंडोशीमध्ये जोरदार गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, यावेळी भाजप आमदार राजहंस सिंह आणि भाजप पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले. यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दोन्ही गटांमध्ये मध्यरात्री तुफान वाद झाला.

औरंगाबाद मध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपः

औरंगाबादमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. औरंगाबाद शहरातील मुख्य गणेश महासंघ गणपतीच्या आरतीवरून नाराजी झाली आणि त्यातूनच हा वाद पेटला. यावेळी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी विसर्जन स्थळावरून काढता पाय घेतला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे येण्याच्या अगोदरच महासंघ अध्यक्ष विजय अवताडे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते आरती केल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यानंतर खैरे यांनी याठिकाणहून काढता पाय घेतला तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही कार्यक्रम स्थळावरून निघून गेले.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!