मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीची सजावट केलेला फोटो व्हायरल होत होता. तेव्हापासून यामुद्यावर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर व्हायरल होत असलेल्या फोटोवरून भाजप नेते शिवसेना पक्षाला टार्गेट करत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. आमच्या सरकारमध्ये तेवढी हिंमत होती. रात्री 2 वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिली गेली. हे प्रतिमा संवर्धन कुणाच्या काळात झालं, हे तुम्हाला माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी ट्वीट करत याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल केला होता. त्यावर ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, या बातमीत कोणतंही तथ्य नाही की याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावण्यात आले. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं. लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात, तो ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या मोठ्या कब्रिस्तानातच नाही, तर सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “महाराष्ट्रामध्ये आलेल्या गद्दारीच्या पीकाला समुळ नष्ट होऊ दे” ; अंबादास दानवेंची गणरायाला प्रार्थना
- Virat Kohli | विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्माची खास पोस्ट! म्हणाली, “मी नेहमीच…”
- NCP | राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, सांगितले त्यामागचे कारण
- KL Rahul | विराटबाबत ओपनिंगच्या प्रश्नावर केएल राहुल म्हणाला, “तर मी काय बाहेर बसू…”
- Rohit Pawar |बारामती पवारमुक्त, मुंबई ठाकरेमुक्त करायची भाजपचे लक्ष, पण सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मात्र मौन-रोहित पवार


