Share

KKR च्या सुनील नरेनने IPL मध्ये रचला इतिहास

Published On: 

नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) दीर्घकाळ खेळणाऱ्या सुनील नरेनने (Sunil Narine) आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. IPL 2022 मध्ये सुनील नरेन सलग 11व्या वर्षी KKR कडून खेळत आहे. इतकेच नाही तर आयपीएल 100 कोटी क्लबमध्ये सहभागी होणारा तो आता दुसरा परदेशी खेळाडू बनला आहे.

अष्टपैलू सुनील नरेनने IPL 2021 पर्यंत 95.2 कोटी रुपये कमावले आहेत. आता त्याला KKR ने IPL 2022 साठी 6 कोटींना विकत घेतले आहे. 100 कोटी रुपये मानधन घेणारा नरेन हा दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स देखील या क्लबचा भाग होता.

सुनील नरेन गेल्या 10 वर्षांपासून केकेआरकडून खेळत आहे. नरेनने KKR साठी विक्रमी 134 सामन्यात 954 धावा केल्या आणि 143 विकेट घेतल्या. गेल्या 10 वर्षांपासून केकेआरकडून खेळताना नरेनला फ्रँचायझीने 95.2 कोटी रुपये मानधन दिले होते. IPL 2022 मध्ये, KKR ने त्याला 6 कोटींना खरेदी केले, ज्यामुळे तो 100 कोटी पगाराच्या क्लबमध्ये सामील होणारा दुसरा परदेशी बनला.

100 कोटी पगाराच्या क्लबमध्ये सामील होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेक भारतीय खेळाडू आहेत. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स यांचा या यादीत आधीच समावेश होता आणि आता सुनील नरेन (KKR) देखील या यादीचा एक भाग आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 साठी फ्रँचायझीने 16 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. या रिटेनशनमुळे जडेजाचा लवकरच १०० कोटी पगार असलेल्या क्लबच्या खेळाडूंच्या यादीत समावेश होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!