नवी दिल्ली : माजी भारतीय दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनी विराट कोहलीबद्दल एक मोठ विधान केल आहे. ते म्हणाले विराट कर्णधार असताना त्याच्यावरती कोणताही दबाव नव्हता. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून खूप धावा निघतील.
भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे ४ मार्च रोजी पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा पहिला सामना विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. मागील सहा महिन्यांपासून कोहलीच्या बाबतीत बऱ्याचशा घटना घडल्या आहेत.
टी-२० विश्वकपाआधी कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वकप साखळी फेरीतूनच भारतीय संघ बाहेर पडला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या वनडे मालिकेपुर्वी त्याला कर्णधार पदावरून हटवण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेबरोबर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने कसोटी कर्णधार पदही सोडले.
विराट कोहली जवळजवळ दोन वर्षांपासून आपल्या ७१ व्या शतकासाठी झगडत आहे. २०१९ नंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. त्यामुळे येणाऱ्या मालिकेत तो शतक करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :


