Share

‘त्या’ प्रकरणी मोदी सरकारविरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. त्यापूर्वीही भाजप नेत्यांकडून असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. आता यावर कॉंग्रेसने आक्रमक भूमिकाम घेतली असून, उद्यापासून (३ मार्च) सुरू होणाऱ्या विधिमंडळच्या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी म्हटले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी आणि मराठी भाषेची अवहेलना करण्याऱ्या मोदी सरकारच्या विरोधात उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळच्या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार.”, असा इशारा नाना पटोले यांनी ट्वीट करत दिला आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले.

चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!