मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, (Aryan Khan had no drugs) असं एनसीबीने (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंतर्गत समोर आले आहे. त्यामुळे आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असे समितीने म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी समितीने म्हटले होते की, अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) याच्याकडे सापडलेले ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा होता की,आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले असून आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे. मात्र आता एनसीबीच्या विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर स्पष्ट झाले आहे की, आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नसून तो त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता. तसेच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते.
दरम्यान या तपासामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच आर्यन खानला क्लीनचिट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या अहवालावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. SIT ने आर्यन खानकडे ड्रग्स नव्हते व समीर वानखेडे टीमने रेड टाकताना केलेल्या चुका प्रकाशात आणल्या आहेत. यातून
नवाब मलिक यांचे आरोप योग्य होते आणि NCB तर्फे खंडणीखोरी चालू होती हे स्पष्ट आहे. NCB Rulebook मधील नियमांचे उल्लंघन समोर दिसत असताना अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
तसेच या रेडमध्ये भाजपचा पदाधिकारी पंच म्हणून सामिल होता. महाराष्ट्रातील भाजपा नेते या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होते. भाजपाने जाहीर माफी मागावी. ज्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले त्यांच्यासह वानखेडेच्या पूर्ण टीमवर कारवाई व्हावी. या अगोदर जेवढ्या तक्रारी झाल्या त्या सर्वांची चौकशी व्हावी. अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘त्या’ रेडमध्ये भाजपचा पदाधिकारी पंच म्हणून सामिल; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
“गर्जेल तो पडेल काय? उगाच टीमक्या,डायलॉगबाजी अन्…”, भातखळकरांचा राऊतांन टोला
“आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होतंय”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा
‘त्या’ घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मोदी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का?; राष्ट्रवादीचा सवाल
“बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल…”, संजय राऊतांनी पुन्हा केले ट्वीट


