Share

सुनील गावसकर यांनी व्यक्त केली भीती; धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव

Published On: 

नवी दिल्ली : टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी संघाची निवड सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का देऊन गेली आहे. दुबई यथे होणाऱ्या या वर्ड कप साठी बीसीसीआयने १५ खेळाडूंची नावे जाहीर झाली आहे. यात आर अश्विनयाचे चार वर्षांनी संघात पुनरागमन झाले आहे. तर सर्वात सुखद धक्का देणारी घोषणा करण्यात आली आहे. ज्यात बीसीसीआयने महेंद्र सिंग धोनीला मार्गदर्शक म्हणून वर्ल्ड कप संघ व्यवस्थापनात सामिल केले आहे. मात्र भारताच्या माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या निर्णयावर एक वेगळीच चिंता व्यक्त केली आहे.

सुनील गावसकर यांनी माहिला मार्गदर्शक म्हणून निवडी बद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र या बरोबरच त्यांनी कोच शास्त्री आणि माही या दोघांमध्ये संघ निवडी आणि डावपेच विषयी चर्चा करताना खटके उडू नये अशी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्री आणि धोनीने मिळून काम करावे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या २००४च्या अनुभवाविषयी सांगत त्यांनी चिंते मागचे कारण सांगितले आहे. त्यावेळी त्यांना सल्लागार म्हणून जेव्हा नियुक्त केले होते. तेव्हाचे मुख्य प्रशिक्षक असलेले जॉन राईट यांना मी त्यांची जागा घेईल असे वाटत होते.” असे सांगितले. मात्र माहिला कोच बनण्यात कोणतेही रस नसल्याचे शास्त्रींना माहिती आहे. त्यामुळे ते एकत्रित काम करत भारतीय संघाला नव्या उंचीवर नेतील असा विश्वास ही जाहीर केला आहे.

महेंद्र सिंग धोनी निवृत्तीनंतर पहिल्यांदाच भारतीय संघाचा भाग असणार आहे. यामुळे त्याचे चाहते अत्यंत खुश झालेले दिसले. धोनीच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला मिळेल यासाठी बीसीसीआयने त्याला मार्गदर्शकपदी रुजू केले आहे. अश्विनचे संघात पुनरागमन जरी झाले असले तरी त्याला संघात जागा मिळेल का हे स्पष्ट नसल्याचेही गावसकर यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!