Share

महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

बाघंबरी – आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.

पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या महंत नरेंद्र गिरी अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आलं असून त्याच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अहवालावरुन महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या याचा खुलासा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!