🕒 1 min read
औरंंगाबाद : जटवाडा भागातील मजूराने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.१८) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. मानसिक विवंचनेतून मजुराने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
सुरेश हरिभाऊ मगरे (वय ५०, रा. दत्तनगर, जटवाडा रोड) असे मृत मजूराचे नाव आहे. आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास सुरेश मगरे यांनी पत्र्याच्या छताच्या बल्लीला ओढणीने गळफास घेतला.
हा प्रकार पाहून शेजा-यांनी लगेचच मगरे यांना फासावरुन उतरवत बेशुद्ध अवस्थेत त्यांना घाटीत दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी मगरे यांना मृत घोषीत केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय आठ दिवसात अहवाल द्या, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे कडक निर्देश
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
